Home नांदेड कोळी बांधवाकडून आ. तुषार राठोड यांच्या सत्कारांचे आयोजन •] दिनकर पावरा यांची...

कोळी बांधवाकडून आ. तुषार राठोड यांच्या सत्कारांचे आयोजन •] दिनकर पावरा यांची बदली केल्यामुळे कोळी व मन्नेरवारलू समाजात मोठा जल्लोष !

237

राजेंद्र पाटील राऊत

कोळी बांधवाकडून आ. तुषार राठोड यांच्या सत्कारांचे आयोजन

•] दिनकर पावरा यांची बदली केल्यामुळे कोळी व मन्नेरवारलू समाजात मोठा जल्लोष !

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाज जात पडताळणीस विलंब लावणाऱ्या दिनकर पावरा यांच्या संदर्भात विधानसभेत प्रश्न मांडीत त्यांची बदली करुन कोळी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल आदिवासी कोळी समाज मुखेडच्या वतीने लोकप्रिय आमदार डॉ.तुषार राठोड यांचा ९ एप्रिल रोजी वाल्मिक नगर मुखेड येथे भव्य नागरिक सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास कोळी व मन्नेरवारलू समाजातील व्यक्ती जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन कोळी महासंघाकडून करण्यात आले असून या कार्यक्रमाला कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शंकर मनाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे मुखेड कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक गजलवाड यांनी माहिती दिली आहे.

आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजातील जात पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास विलंब लावुन समाजातील नव तरुणांवर एकप्रकारे अन्याय दिनकर पावरा यांच्याकडून करण्यात येत होता. यांच्या बदलीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असताना पाच वर्षांपासून पावरा त्याच ठिकाणी होते. या संदर्भात कोळी व मन्नेरवारलू समाजातील लोकांनी आमदार डॉ. तुषार राठोड यांच्याकडे तक्रार केली होती.
या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनकर पावरा यांची बदली करा अशी मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी विधानसभेत लावून धरल्यामुळे शासनाकडून याची दखल घेत दिनकर पावरा यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यामुळे मुखेड कोळी व मन्नेरवारलू समाजात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 9 एप्रिल रोजी आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजाच्या वतीने आमदार डॉ. तुषार राठोड यांचा भव्य नागरीक सत्कार ठेवण्यात आला आहे . या कार्यक्रमाला जिल्ह्यातील आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजातील लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुखेड कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक गजलवाड यांनी केले आहे.

सत्कार मुर्ती आ. डॉ. तुषार राठोड मुखेड विधानसभा

Previous articleउद्योजक संजय बियाणी यांच्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक – पालकमंत्री अशोक चव्हाण
Next articleदिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.