राजेंद्र पाटील राऊत
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे होणार नवीन कार्डियाक कॅथलॅब
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नाना यश
अर्थसंकल्पात १.५ कोटी रुपये मंजूर
आता गडचिरोलीतच होणार हृदय रोग तपासणी व रुग्णांवर उपचार
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्डियाक कॅथलॅब करिता १५० लक्ष रुपयाची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने लवकरच गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यातच हृदयाशी संबंधित आजारावर उपचार होणार आहेत .करिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हृदयाशी संबंधित उपचाराकरिता नेहमीच नागपूर – चंद्रपूर येथे जावे लागते. त्याकरिता त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. परंतु आता यासंबंधीत तपासणी व उपचार गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मिळणार असल्याने येथील रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.