Home वाशिम जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. जिल्हाधकाऱ्यांच्या...

जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. जिल्हाधकाऱ्यांच्या हस्ते सत्कार.

82
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0014.jpg

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                                            दि. २ एप्रिल २०२२ रोजी मानोरा जि. वाशिम येथे प्रादेशिक जंगलाला लागलेली आग विझविण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक ने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले याचा सन्मान म्हणून आज वाशिम जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी मा. शण्मुगराजन एस. सर यांच्या हस्ते पथकाच्या सदस्य ओम वानखडे, प्रविण गावंडे, नयन राठोड, सचिन राठोड, व इतरसदस्याचा शाॅल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय मा. शैलेश हिंगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा. शाहु भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे, समन्वयक प्रा.बापुराव डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सरांनी सर्व रासेयो स्वयंसेवकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here