राजेंद्र पाटील राऊत
कोरवाडी शिवारात पाण्याच्या शोधात असलेले पाच निलगाई (रोही) विहिरीत पडले; एकाचा मृत्यू.
जिंतूर,(विष्णू डाखुरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
बामणी शिवारातील कोरवाडी येथील रावसाहेब बनसोडे यांच्या शेतात पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेल्या पाच नीलगाई विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.तर चार निलगाई गावकऱ्यांनी वर काढल्या.
उन्हाचा कडाका वाढल्या मुळे प्राण्यांना पिण्याच्या पाण्या साठी वन वन भटकंती करावी लागत आहे. त्या मुळे ज्या ठिकाणी पाणी दिसेल त्या ठिकाणी हे प्राणी पाणी पिण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरवाडी शिवारातील हा प्रकार घडल्याने येथील सरपंच दिनकर अलाटे यांनी तात्काळ वनविभागाला कळवून या पाच ही नील गाई गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून वर काढल्या आहेत. या वेळी वन विभागाचे कंत्राटी वाचमन बबन वाकळे बामणीकर पोलिस स्टेशन चे बीट जमादार वसंत निळे,भगवान सोड्गिर तसेच कोरवाडी ग्रा.पं. सदस्य मारोती जाधव ,सुदाम धांगड,गजानन कोंडाळ, विष्णू जाधव ,रावसाहेब बनसोडे आदींनी या नीलगाईना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.