Home गडचिरोली जी.प.अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी अवंती अनिल गांगरेड्डीवार हिला पुरस्कार प्राप्त केल्याने...

जी.प.अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी अवंती अनिल गांगरेड्डीवार हिला पुरस्कार प्राप्त केल्याने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

193

राजेंद्र पाटील राऊत

जी.प.अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी अवंती अनिल गांगरेड्डीवार हिला पुरस्कार प्राप्त केल्याने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला                                                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नुकताच बेंगलोर येथे झालेल्या स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया (SAI) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पटियाला चा कबड्डी (NIS)प्रशिक्षणा “A” ग्रेड मध्ये पास करून ती अर्जुनवाडी माननीय हुनपप्पा चा हाताने सर्टिफिकेट प्राप्त केलेला आहे. तसेच भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षक माननीय भास्करन सर यांच्या हातून प्रशिक्षण पूर्ण केलेला आहे. अवंती ही आंतरराष्ट्रीय खेळाडू असून ती Bsc, BPed, MPEd शिक्षण पूर्ण घेतली असून 2019 पासून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींची आश्रम शाळा खमणचेरु अहेरी प्रोजेक्ट ऑफिसर इथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. विदर्भातून कबड्डी मध्ये NIS करणारी ती पहिली प्रशिक्षक आहे.गेल्या तीन वर्षापासून आदिवासी मुलींना प्रशिक्षण देऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर मुलींना खेळवलेला आहे व मुलींना शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण देत आहे. अवंती ही मुळची चंद्रपूर जिल्ह्यातील असून या तरुणीने शिकाई मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे तसेच राज्याचे नाव गौरवित केलेले आहे. तायकंडोम मध्ये गोडवाना विद्यापीठाचा कलर कोट असून आजपर्यंतच्या कार्यकारणी मिळालेल्या यशाचे श्रेय ती आपल्या परिवाराला व प्रशिक्षकांना देते आहे. अवंती अनेक राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावाने केलेले आहे.

आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावाने प्राप्त केल्याने अवंती चे पूर्ण जिल्ह्यात गौरव करण्यात येत आहे

Previous articleमहिलानी आर्थिक स्वसाह्यता निर्माण केल्यास त्या कुटुंबाची प्रगती निश्चित
Next articleजिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पेंटीपाका येथील नवीन अंगणवाडी केंद्राचे लोकार्पण..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.