राजेंद्र पाटील राऊत
दिल्लीची चमू करणार मार्कंडा देवस्थान पर्यटन स्थळ व मंदिर बांधकामाची पाहणी..
खासदार अशोक नेते यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश..
मार्कंडा देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळणार..
गडचिरोली :- (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे मंदिराच्या जीर्णोद्धार चे काम गेल्या 4-5 वर्षांपासून सुरू आहे मात्र ते अजूनही पूर्ण झालेले नाही. याबाबत अनेकदा खासदार अशोक नेते यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र काम अतिशय संथपणे सुरू असल्याने काम पूर्ण होऊ शकले नाही. याकडे जातीने लक्ष देत खासदार अशोक नेते यांनी वारंवार पत्रव्यवहार करून दिल्लीचे अतिरिक्त महानिदेशक कांजवेशन यांच्या निर्दशनास ही बाब आणून दिली व भ्रमणध्वनी वरून त्यांच्याशी चर्चा करून मार्कंडा देवस्थान चे बांधकाम यथशिग्र पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त महानिदेशक यांनी मार्कंडा या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी व मंदिराचे बांधकाम तातडीने पूर्ण होण्यासाठी दिल्लीची एक टीम येत्या 10 दिवसात मार्कंडादेव येथे पाठविणार असून सदर चमू संपूर्ण बांधकामाची पाहणी करणार असून पर्यटन स्थळाचा विकासाच्या दृष्टीकोनातून सर्व्हे करणार असल्याचे त्यांनी खासदार अशोक नेते यांना सांगितले..
खासदार अशोक नेते यांनी ADG यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, मार्कंडा देवस्थान हे विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाते. येथे दरवर्षी महाराष्ट्रसह शेजारील 6-7 राज्याचे लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी या देवस्थानच्या सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी आपण लोकसभेत प्रश्न उपस्थित करून मार्कंडा देवस्थान या पर्यटन स्थळाला केंद्रीय पर्यटनाच्या सूचित समाविष्ट करून केंद्रीय पर्यटनाचा दर्जा देऊन या स्थळाचा विकास करून येथे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्याची मागणी केली आहे. याची गांभियाने दखल घेऊन मंदिर जीर्णोद्धार चे काम तात्काळ पूर्ण होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून विकासासाठी निधी मंजूर करण्याची मागणीही त्यांनी यावेळी चर्चेदरम्यान केली. यावेळी अतिरिक्त महा निदेशक कांजर्वेशन श्री जहन्विज शर्मा, नीदेशक conservation श्री वसंत स्वर्णकार, खासदार अशोक नेते यांचे स्वीयसहाय्यक रवींद्र भांडेकर उपस्थित होते…
दिल्लीच्या केंद्रीय चमू द्वारे मार्कंडा देवस्थानच्या कामाची पाहणी व सर्व्हे होणार असल्याने आता लवकरच या पर्यटन स्थळाचा विकास होऊन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होणार असल्याचे खासदार अशोक नेते सांगितले…