Home कोकण नारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद

नारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद

126
0

राजेंद्र पाटील राऊत

नारशिंगेमध्ये भाविकांनी घेतला माघी उत्सवाचा आनंद              रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शिवकालीन स्थळ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वयंभू येथे काल शुक्रवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी माघी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नारशिंगे परिसरातील स्थानिक भाविकांसह इतर गावंतील मोठ्या प्रमाणात भाविकांनी स्वयंभू श्रींचे मनोभावे व श्रद्धापूर्वक दर्शन घेतले.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या टाळेबंदीमुळे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे माघी यात्रोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने झालेला होता. त्यामुळे यंदा तरी माघी यात्रा उत्सवाचा आनंद घेता येईल या अपेक्षेने सर्व स्थानिक भाविक वाट पाहत असताना शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता निर्माण केल्याने यंदा माघी उत्सव या ठिकाणी पार पडला.

नारशिंगे बरोबरच नजीकच्या बोंड्ये, राई, विल्ये, मांजरे, पोचरी, जाकादेवी,रत्नागिरी,पुणे,कर्नाटक या भागातील भाविक मोठ्या संख्येने नारशिंगे येथे दाखल झाले होते. यावेळी आलेल्या भाविकांनी स्वयंभू गणेश मंदिरात जाऊन श्रीं चे दर्शन घेऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विशेष कामगिरी बजावली. यावेळी या उत्सवाच्या निमित्ताने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष कामगिरी करताना सर्व गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम केले.

या उत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी ७ वा. स्थानिक ग्रामस्थांचे भजन श्रींच्या मंदिराच्या करण्यात आले. यावेळी नारशिंगेतील सर्व प्रमुख मंडळी, स्थानिक ग्रामस्थ या भजनामध्ये सहभागी झाले होते. विशेष आकर्षण असलेला कार्यक्रम रात्रो १०:३० ला नमनाचा कार्यक्रमाला सुरुवात होवून १२ : ०० पर्यंत संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here