Home पुणे एमपीएससी परीक्षेचा आणखी एक बळी : पुण्यात अमर मोहिते एमपीएससी विद्यार्थीची आत्महत्या..!

एमपीएससी परीक्षेचा आणखी एक बळी : पुण्यात अमर मोहिते एमपीएससी विद्यार्थीची आत्महत्या..!

558
0

राजेंद्र पाटील राऊत

एमपीएससी परीक्षेचा आणखी एक बळी : पुण्यात अमर मोहिते एमपीएससी विद्यार्थीची आत्महत्या..!

ठाणे ( अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

एमपीएससी पुर्व/मुख्य परीक्षा गेल्या वर्षभरापासून राहिलेल्या परीक्षा घेण्यासाठी व नवीन जाहिराती प्रसिद्ध केली आहेत. एमपीएससी ने या बाबतीत वेग घेतला आहे.
परंतु याच दरम्यान पुण्यात एमपीएससी परीक्षेचा तणावातून आणखीन एक एमपीएससी विद्यार्थीची आत्महत्या केली आहे.
पुण्यात एमपीएससी परीक्षेचे तयारी करणाऱ्या अमर मोहिते नावाच्या विद्यार्थीने आत्महत्या केली आहे. अमर हा मूळचा सांगलीचा आहे तो पुण्यात हॉस्टेल वर राहत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्यावर psi होण्याची संधी त्याची हुकली होती. फक्त १ मार्क कमी पडल्याने आणे मराठा आरक्षण रद्द झाले होते त्यामुळे psi शारीरिक चाचणी तून तो बाहेर पडला होता. त्यामुळे तो प्रचंड तणावामध्ये होता.
गेल्या २ वर्षापासुन psi पास होणाऱ्या विद्यार्थीना नियुक्ती दिलेले नाही तसेच रात्रीचा दिवस करून गेले २ वर्षापासुन परीक्षा पास होऊन सुधा अजून शारीरिक चाचणी करिता एमपीएससी ने पात्र विद्यार्थीना बोलावले नाही. गेले २ वर्षापासुन ग्राउड प्रॅक्टीस करणाऱ्या विद्यार्थीपैकी एक अमर मोहिते होता.
त्यामुळे कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये एमपीएससी ने गट क,गट ब मिळून १६०० जागांची जाहिरात २०२२ ची प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७.०१.२०२२ आहे.
एमपीएससी ने कोरोना च्या काळातील परीक्षा घेतल्या नाहीत अचानक पुढे ढकलल्या होत्या. मराठा आरक्षणावर अवलंबून असलेल्या मुलांना त्याचे नुकसान अभासाचा ताण, नैराश्य येऊ लागले आहे. त्याचा परिणाम आजचे अमर मोहिते ची आत्महत्या दिसून येते. एमपीएससी प्रशासनाने देखील गेल्या वर्षभरापासून राहिलेल्या परीक्षा घेण्यासाठी, व राज्यात आरोग्य विभागाच्या,म्हाडाच्या, परीक्षेत घोटाळे गाजत आहेत त्यामुळे आधीच निराशेच्या गर्तेत सापडलेले उमेदवारांना एमपीएससी ने परीक्षा लौकर घेऊन दिलासा द्यावा ही आशा आहे.
सर्व एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी असे टोकाचे पाऊल न उचलण्याचे युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर आणि राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ तर्फे आवाहन करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here