राजेंद्र पाटील राऊत
संदिपजी लांजेवार यांना गोंडवाना विध्यापीठाची समाजकार्य विषयात (phd) आचार्य पदवी घोषीत।
आचार्य पदवी स्वर्गिय वडिल मनोहर श्रावन लांजेवार यांना समपित।
गडचिरोली:( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गडचिरोली येथील संदिप मनोहर लांजेवार यांना गोंडवाना विध्यापीठाच्या समाजकार्य विषयावर phd आचार्य पदवी घोषीत झाली आहे,स्थांनिक फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वक्र या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संशोधन विषयावर रुची निर्माण झाली, आणि गडचिरोली जिल्हात बालक,महिला यांच्या विकासात काय आढावा आहे हे जाणुन घेण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांनी सुरु केला,त्याला जोड म्हणुन विध्यापीठाच्या phd विभागातुन त्यांनी शोध प्रबंध तयार केला.
गडचिरोली जिल्हात राबवित येणार्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे जिल्हातील ग्रामीण भागावर झालेले परिवर्तण एक चिकित्सक अध्ययन या शिर्षकावर शोध प्रबंध गोंडवाना विध्यापीठात साधर केले होते.त्यानुसार त्याचे परिक्षण केल्यावर विध्यापीठाच्या जाहिर केलेल्या अधिसुचणे नुसार त्यांना आता आचार्य पदवी घोषीत करण्यात आली आहे.या संपुर्ण संशोधन मार्गदर्शक म्हणून फुले आंबेडकर कॉलेज ऑफ शोशल वक्र महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश खंगार यांनी मार्गदर्शन केले.
या संशोधनात गडचिरोली जिल्हात 1984 पासुन सुरु झालेल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या कामाचे सविस्त अंंध्ययन केले त्यामुळे जिल्हात बाल विकास व महिला विकास या विषयावर अंगणवाळी, अधिकारी, गावातील लोकसहभाग आंणी प्रत्यक्ष लाभार्थी यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा आहे आंणी त्यामुळे ते परीर्वतन जिल्हात झाले हे जवळुन अभ्यास त्यांनी केला आहे.त्यामुळे भविष्यात महिला व बाल विकास विषयावर या संशोधन कार्याचा आढावा नक्की कामात येणार असल्याचे समजते.
डॉ.संदिप लांजेवार यांनी या संशोधन कालावधित राष्ट्रिय आणी अंतरराष्ट्रीय पञिके मध्ये विषयावर आधारीत पेपर सुध्दा प्रकाशीत केला आहेत.आणी विविध कार्यशाळा,संगोष्टी,परिसंवाद,आणी कॉन्फरन्स मध्ये सहभागी हऊन सादर विषयावर व्यापक कार्य केले आहे.त्या संपुर्ण विषयाचा आढावा घेत सादर केलेल्या प्रबंधाला गोंडवाना विध्यापिठाच्या माध्यमातुन आचार्य पदवी करित मान्य करुन डॉ.संदिप मनोहर लांजेवार यांना आचार्य पदवी घोषीत केलेली आहे.या शिक्षण क्षेञातील उच्चस्तरीय पदवी मिळाल्यामुळे डॉ.संदिप मनोहर लांजेवार यांना सर्वदूर अभिनंदण केले जात आहे.
डॉ.संदिप मनोहर लांजेवार यांनी घोषीत झालेल्या आचार्य पदवीला त्यांचे वडिल स्वर्गीय मनोहर श्रावण लांजेवार यांना समपित केली आहे.
या यशाचे श्रेय वडिल मनोहर लांजेवार आई प्रमिला लांजेवार,पत्नी माधुरी लांजेवार, मुलगी वामिन्य लांजेवार,काका हुमेश लांजेवार,हेमराज लांजेवार,काकू शुभागी, ऊर्मिला लांजेवार, महीविध्यालयातील प्राध्यापक व्रंद,अखिल भारतीय विद्यार्थि परिषद, आणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व मिञ मंडळी यांना दिले आहे.