Home महाराष्ट्र राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काय आहेत नवीन नियमावली 🛑

राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काय आहेत नवीन नियमावली 🛑

417
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211214-WA0002.jpg

🛑 राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काय आहेत नवीन नियमावली 🛑
✍️ मुंबई : विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

मुंबई:⭕१२/१२/२०२१ रोजी पासुन मोटार वाहन कायद्यामधील नवीन सुधारणेमुळे वाहन नियमभंगाच्या अपराधाबद्दल आकारण्यात येणा-या दंडाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

विना खर्चिक आणि सामान्य नियम न पाळणे म्हणजेच वाहन चालविताना ड्रायव्हरसह पुढील सीटवर बसलेल्या व्यक्तीन् सीट बेल्ट न लावणे,सिग्नल मोडणे, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग रेषेवर वाहन थांबविणे किंवा त्याच्या पुढे वाहन थांबवणे,लेनची शिस्त न पाळणे,वाहन नो पार्किंग जागेत लावणे ,वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे,कर्ण कर्कश्य हॉर्न वाहनास बसविणे,वाहनास दोन्ही बाजुस आरसे नसणे,पोलीसांनी वाहन थांबविण्याचा केलेला इशारा न पाळता निघुन जाणे,वाहन धोकादायक पद्धतीन चालविणेे तसेच वाहन वेग मर्यादे पेक्षा जास्त वेगाने(ओव्हर स्पीड) चालविणे, वाहनाचा विमा न काढणे,विना ड्रायव्हिंग लायसन्स ,विना हेल्मेट,ट्रीपल सीट मोटार सायकल चालविणे लहान अल्पवयीन मुुलांना वाहन चालविण्यास देणे यासारख्या चुकांसाठी ५०० ते १०००, २०००, ५०००/- रुपये व त्यापेक्षा जास्त आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे.

याबाबत अधिकृत शासकीय आदेशाप्रमाणे ई-चलन मशीनमध्ये बदल करण्यात आले असुन त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र पोलीस दलाने सुरु केली आहे.

त्यामुळे आपण सर्वांनी वाहन चालविताना वरील चुका न करता स्वत: वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन तसेच आपली मुले, मित्र,नातेवाईक आणि आपले हितचिंतक यांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रवृत्त करुन आर्थिक नुकसान टाळावे.⭕

Previous articleसंदिपजी लांजेवार यांना गोंडवाना विध्यापीठाची समाजकार्य विषयात (phd) आचार्य पदवी घोषीत। आचार्य पदवी स्वर्गिय वडिल मनोहर श्रावन लांजेवार यांना समपित।
Next articleछावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र च्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रार्थमिक आरोग्य केंद्र मरखेल येथे रुग्णांना फळांचे वाटप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here