Home नांदेड नायगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची आरोग्यमंत्री राजेश...

नायगाव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.

317

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.
नायगाव शहर प्रतिनिधी निळकंठ पाटील मोरे (युवा मराठा न्यूज)
नायगाव: नायगाव तालुक्यातील नायगाव ग्रामीण रुग्णालय, कुंटुर प्राथमिक आरोग्य केंद्र, बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्र, व नायगाव तालुक्यातील कृष्णूर,घुंगराळा, आंतरगाव, कहाळा, सोमठाणा, राहेर, देगाव यागावांसह नायगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, व नायगाव तालुक्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र यांना याठिकाणी लागणारे वैदयकीय उपकरणे, फर्निचर, बेड,रुग्णांच्या तापासणीकरिता लागणाऱ्या अत्याधुनिक मशीन आरोग्य विभागाने पुरवाव्यात यावी अशी मागणी वसंत सुगावे पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्याकडे केली आहे.
तसेच बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थान बांधकामास मंजुरी देऊन निधी देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली.
यावर आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांनी संबंधित विभागाना निर्देश देऊन कामे मार्गी लावू असे सांगितले.

Previous articleरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण चा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपास जाहीर पाठिंबा 
Next articleविद्युत ट्रांसफार्मर वर चढत दहिवड येथे चांदवड तालुक्यातील एकाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.