राजेंद्र पाटील राऊत
तळवाडे ते मालेगाव बस सुरू करा. मागणी.
मालेगाव :(निंबा जाधव विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- तालुक्यातील तळवाडे हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून गेल्या दीड वर्षापासून बस बंद आहे.बस बंद असल्याने नागरिकांना मालेगाव येथे कामानिमित्त येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.लखमापूर येथून अथवा रावळगाव येथे येऊन मगच बसणे प्रवास करावा लागत आहे.
नुकताच शासनाने महाविद्यालय चालू करण्याबाबत निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.तेव्हा तळवाडे येथे रात्री मुक्कामी येणारी तसेच दुपारच्या वेळेत चालू असणारी बस सुरू करण्यात यावी अशी मागणी तळवाडे ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मालेगाव आगार प्रमुख ढगे यांचे कडे केली आहे. त्यांनी निवेदनाची दखल घेऊन तळवाडे मालेगाव बस येत्या चार ते पाच दिवसात सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी बंडू कुवर,निंबा जाधव,डॉ.वाघ,दादाजी जाधव,उत्तम जाधव इ.सह विद्यार्थी व नागरिक हजर होते.