Home नांदेड Titleराज्य तलाठी संघाच्या कार्यकारिणीवर उदयकुमार मिसाळे

Titleराज्य तलाठी संघाच्या कार्यकारिणीवर उदयकुमार मिसाळे

312

राजेंद्र पाटील राऊत

राज्य तलाठी संघाच्या कार्यकारिणीवर उदयकुमार मिसाळे

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्हा तलाठी संघाच्या नूतन कार्यकारिणी ची बैठक दि ९ आॅक्टोंबर रोजी जिल्हाध्यक्ष एन. जी.कानगुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या राज्य कार्यकारणीवर उदयकुमार मिसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर झालेल्या बैठकीत तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या अडीअडचणी विषयी चर्चा करुन संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली आणि आगामी काळात होणा-या महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या राज्याधक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत राज्य कार्यकारिणीवर नांदेड जिल्ह्यातून प्रतिनिधी म्हणून उदयकुमार मिसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पुर्वीही उदयकुमार मिसाळे यांनी जिल्हा सचिव पदाची धुरा सांभाळुन तलाठी, मंडळाधिकारी यांच्या अडचणी सोडविल्या आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील तलाठी संघाचे तालुका अध्यक्ष मुखेडचे ज्ञानेश्वर रातोळीकर ,कंधारचे
औदुंबर वाडीकर, धर्माबादचे बी.जी.कदम, अर्धापुरचे लक्ष्मण देशमुख, देगलुरचे बालाजी पुष्पलवार ,उमरीचे नारायण गाजेवार, मुदखेडचे बालाजी कुऱ्हाडे,माहुरचे
तानाजी सुगावे,नायगावचे विजय जाधव,नांदेडचे प्रदीप उबाळे,लोह्याचे मारोती कदम ,हिमायत नगरचे रामचंद्र पुरी,किनवटचे अंकुर सकवान आदी सह अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleपुण्यात अल्पवयीन कब्बडीपटू मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या..! महाराष्ट्र हादरला,अजिदादांनी दिसले कारवाईचे आदेश….?
Next articleसांगलीत महिलेचा गळा दाबून खून, मानलेल्या पतीला अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.