Home नांदेड ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे 73 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात...

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे 73 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

518

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे 73 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. 73 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच श्रीमती वनिताताई गनलेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तलाठी सौ.माने मॅडम यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राजू पाटील सूर्यवंशी यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य राजू वाघमारे यांनी केले. सरपंच श्रीमती वनिताताई गनलेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 73 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित राजू आडबलवार (संगणक ऑपरेटर), ग्रामसेवक पांचाळ सर, तलाठी सौ.माने मॅडम, शिवाजी पंदनवाड, राजू पाटील सूर्यवंशी, श्रीराम पाटील वडजे, रमेश अडबलवार, गुंडाजी पाटील सूर्यवंशी, राजू वाघमारे,मगदूम शेख, हनमंत गनलेवार, पत्रकार बांधव,सेवक हिरामण सोनकांबळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.
Next articleराष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.