Home नांदेड नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

405

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

कै.रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय, शेळगाव (गौरी) ता.नायगाव जि.नांदेड या विद्यालयात 73 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पेटकर सर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री माधव किशनराव घाटोळे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील उपस्थित असलेले श्री स्वामी सर,श्री पालनवार सर, श्री बाचकलवाड सर, श्री शिरंजीपालवार सर, श्री जाधव सर, श्री कुदरे सर, श्री शिपांळे सर, गोपीनाथ बळेगावे,श्रीराम घाटोळे,यावेळी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यी उपस्थित होते यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी कु.उत्कर्षा गजेंद्र पाटील हिने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या विषयी मनोमन व्यक्त केली, कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप मनोगतातून श्री पेटकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री पालनवार सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री स्वामी सरांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानातून करण्यात आली.

Previous articleतंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवराज पाटील दरोडे यांची बिनविरोध निवड
Next articleग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे 73 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.