Home माझं गाव माझं गा-हाणं अधिकार्‍यांवर टीका करणे पत्रकारांचे परमकर्तव्य. मानसिंग पाटील यांचे पत्रकाररत्न पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

अधिकार्‍यांवर टीका करणे पत्रकारांचे परमकर्तव्य. मानसिंग पाटील यांचे पत्रकाररत्न पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

379

राजेंद्र पाटील राऊत

अधिकार्‍यांवर टीका करणे पत्रकारांचे परमकर्तव्य.
मानसिंग पाटील यांचे पत्रकाररत्न पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन                                                                        पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज)

राजकारणी आणि अधिकार्‍यांवर टीका करणे पत्रकारांचे परमकर्तव्य आहे. या टीकेतूनच समाजाला दिशा देण्याचे कार्य सुरू होते. आम्ही कुठेही कमी पडत असलो तर त्याची जाणीव पत्रकारांनी आपल्या लेखणीतून द्यावी. कमीपण वाटण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन पोलीस अधिकारी मानसिंग पाटील यांनी पालघरमध्ये केले. महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्यावतीने आर्यन सोसायटीच्या म. नि. दांडेकर सभागृहात आयोजित जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. टॉप टेन पालघर 2021 गुणवंतांची यशोगाथा महामॅगेझिनचेही प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार भाऊसाहेब गुंड, रायचंदभाई शहा, स्वामिनाथ पांडे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांव्यतिरिक्‍त समाजामध्ये भरीव कामगिरी करणार्‍या अतिथींचाही सन्मान यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक गुंड यांनी, तर सूत्रसंचालन राजू शर्मा यांनी केले.
यावेळी श्रवणसिंह राजपुरोहित, मुकेश दुबे, गिरजेश सिंह, शैलैश सिंह ठाकुर, रमेश चौहान, मधुकर पाटील, राधेश्याम चौधरी, अ‍ॅड. जयेश आव्हाड, अ‍ॅड. धरमसेन गायकवाड, छायेश झारापकर, सुरज मलहोत्रा, सुरज कैटर्स, निलेश पाटील, आर्किटेक्ट बिरूण जी, सौ. चंदा दीपक दुबे, पत्रकार ओमप्रकाश द्विवेदी, जावेद लुलानिया, स्नेहित पाटील, हर्षद पाटील, मंगेश तावडे, के. वी. नारायण, सुनील उघडे आदींचा सन्मान करण्यात आला.

Previous articleनिसर्ग प्रेमींनी केला समुद्र किनारा स्वच्छ.
Next articleवाखारी येथील कार्तिक चंद्रकात भामरे यांची हरियाणा येथे नॅशनल स्कृस्ती स्पर्धेत निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.