Home नांदेड मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन...

मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यास हेक्टरी 25 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या. आकाश पा वडजे उंद्रीकर यांची मागणी

237

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टीचे संकट.

तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यास हेक्टरी 25 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या.

आकाश पा वडजे उंद्रीकर यांची मागणी
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गेल्या आठवड्यापासून मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्हात पाऊसाने थैमान घातले असुन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास लहरी पाऊसामुळे हिरावून नेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यास हेक्टरी 25 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या अशी मागणी युवक काँग्रेस चे महासचिव आकाश पा वडजे उंद्रीकर यांनी केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे उडीद सोयाबीन कापुस तुर व इतर अनेक पिके या पावसामुळे वाहून गेली. उडिद सोयाबीन भिजुन त्याला कोंब फुटत आहेत अशातच अनेक शेतकऱ्यांचे उडीत कापुन गोळा करून ढिग ठेवले होते त्याच्या खालुन पाऊसाचे पाणी जाऊन त्यांचे पण मोठं नुकसान झाले आहे.सतत दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे विमा उतरवित आहे जेणेकरून अशा लहरी संकटामुळे त्यांना पिक विमा मिळुन मदत होईल या आशेने विमा भरत आहेत परंतु पिक विम्याच्या जाचक‌ अटीमुळे तीन ते चार वर्षांपासून नुकसान होऊन देखील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. पिक विम्याच्या विषयावर कोणी आवाज उठवला तयार नाही.त्यामुळे किमान यावर्षी तरी पिक विमा मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. नांदेड जिल्हाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण साहेब यांनी पिकविमा कंपनीला आगाऊ 25%रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची सुचनाही केली परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे खुपचं जास्त नुकसान असल्यामुळे त्यांना भरीव पिक विमा मिळवून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे हि पण मागणी केली आहे.अनेक गावातील नदी नाले या अतिवृष्टीच्या पाऊसामुळे भरुन वाहत असुन नदी नाले काठच्या जमिनीत पाणी घुसून जमिनी खरडुन‌ वाहुन गेली आहे अशा अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मदत केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Previous articleशेळगांव (गौरी) ता. नायगाव येथे पोळ्या निमित्ताने जनावरांच्या रोग तपासणी शिबीर संपन्न.
Next articleमुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) गावास आले तळ्याचे स्वरूप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.