Home नांदेड शेळगांव (गौरी) ता. नायगाव येथे पोळ्या निमित्ताने जनावरांच्या रोग तपासणी शिबीर संपन्न.

शेळगांव (गौरी) ता. नायगाव येथे पोळ्या निमित्ताने जनावरांच्या रोग तपासणी शिबीर संपन्न.

231
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगांव (गौरी) ता. नायगाव येथे पोळ्या निमित्ताने जनावरांच्या रोग तपासणी शिबीर संपन्न.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आदर्श गांव शेळगांव (गौरी) ता,नायगांव येते शेतकरी बांधवांचा अत्यंत महत्त्वाचे सण म्हणजे पोळ्या निमित्ताने गावातील सर्व जनावरांच्या आरोग्य तपासणी करुण रोग प्रतिकार औषधी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय व सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे.उपसरपंच सौ,शालीनीताई राजेन्द्र पाटील शेळगांवकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुचना करुण व पालन करुन हे शिबीर घेण्यात आले.

ग्रामीण भागात पशुपालन व्यवसायात पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते त्यातील महत्वाच्या अडचणी, दुध उत्पादन व दुध गुणवत्ता या आहेत.

आजच्या बाजार पेठेतील स्पर्धेत आपणास टिकावयाचे आसल्यास आपल्या दुग्धजन्य उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी लागेल. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनावरांचे आरोग्य होय. गाईचे किंवा म्हैशींचे आरोग्य निरोगी असल्यावरतीच त्यांच्यापासून आपणास उच्च प्रतीचे दुग्ध उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. जनावरांतील काही महत्त्वाचे रोग. संसर्गजन्य रोग
हे रोग मुख्यतः विषाणू आणि जिवाणूंमुळे होतात. निरोगी जनावरांच्या शरीरात श्‍वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावरांशी संपर्क आणि माणसांद्वारे रोगकारक जंतू प्रवेश करतात. जनावरांतील संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित लसीकरण करून घ्यावे. यामध्ये अँथ्रेक्स, काळा पाय (Black Leg), लाळ्या खुरकत रोग (Foot & Mouth), बुळकांडी रोग (Rinder Pest), स्तनदाह (Mastitis), पाय कुज (Foot Rot) यांचा समावेश होतो.
1) अँथ्रेक्स:
गाईमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा रोग असुन घातकही आहे. या रोगामुळे जनावर जास्त दिवस जिवंत राहत नाही. हा रोग मोठे बिजाणु तयार करणार्‍या आयताकृती जिवाणुंपासुन होतो. त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलस अँथ्रेक्स (लरलळश्रर्श्रीी रपींहीरलळी) असे आहे. रवंथ करणार्‍या प्राण्यामध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळुन येतो. बॅसिलस जिवाणु अतिउच्च प्रतिचे घातक घटक निर्माण करतात. त्यामुळे जनावरांमध्ये मृत्युचे प्रमाण जास्त आढळुन येते. या जिवाणुला बिज तयार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. जनावरांमध्ये रोगाची लक्षणे जिवाणूंची  बिजांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर 3 ते 7 दिवसानंतर दिसुन येतात. जनावरांमध्ये लक्षणे दिसु लागल्यानंतर जनावर दोन दिवसात मृत पावते. पायांना खुरे असणारी उदा. हरिण, गाय, शेळी व मेंढी या जनावरांमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने ज्यावेळी जनावर चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात त्यावेळी हे जिवाणु श्‍वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करतात. या जिवाणुंना कोणताही वास, चव, रंग नसतो. तसेच ते डोळ्यांना सहजरित्या दिसतही नाहीत. या जिवाणुंचा प्रवेश जनावराप्रमाणे माणसातही होत असतो. भूपृष्ठावरती मोठा प्रमाणात अँथ्रेक्सचे जिवाणू हवेत रोग लागण झालेल्या जनावरांमार्फत सोडण्यात येतात.

या शिबीरात साह्यक पशुवैद्यकिय अधिकारी डाँ.होणशेट्टे.डाँ.खैसर.डाँ.देवघरे.डाँ.पूजारी महाराज.डाँ.जाधव.व शिपाई चव्हाण व कंधारे हे प्रमुख तपासणी करणारे होते.या शिबीरात तपासणी जनावरं बैल 230 गाय 140 तर म्हैस 145 जवळजवळ 500 जनावराची तपासणी करुण वंधत्व निवारण.मल्टीव्हीट्यामन गोळ्या.इंजेक्शन व अत्यंत उपयोगी औषधी देण्यात आले.या शिबीराचे आयोजन ग्रामपंचायत सरपंच प्राचार्य डाँ,मनोहर तोटरे.उपसरपंच सौ.शालीनीताई पा.शेळगांवकर.ग्रा.सदस्य मा,सैनिक मोहन मेडाबलमेवार.केशव पा.शिंपाळे.सौ.सुमित्राबाई अशोक बावणे.प्रा.समदानी सय्यद.सौ,सगिता लक्ष्मण कांबळे.सौ,आशाताई ईबितदार.तर गावातील प्रतिष्ठित शेतकरी सुधाकर पाटील,भाऊसाहेब पाटील.नागोराव पाटील,मा.उपसरपंच हाणंमत वाघमारे.सेवा स.सोसायटी सदस्य संतोष देशमुख.शिवाजी शिपांळे.श्रीराम वाघमारे.माधव वाढवणे,नारायण वाढवणे. व ग्रामविकास अधिकारी धनराज केत्ते,यानी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here