राजेंद्र पाटील राऊत
अकोला : ( सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- अकोला जिल्ह्यात एकीकडे कोरोनाव्हायरस संक्रमण कमी होत असताना जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली या बाबत आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी माहिती देत हा रुग्ण अकोट येथील रहिवासी असून 29 जून रोजी त्याला उपचाराकरिता अकोला कोवीड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते अशी माहिती त्यानी दिली.
दर महिन्यात शंभर सॅम्पल दिल्ली येथील लॅबला पाठवण्यात येतात त्यामध्ये या रुग्णाचा सॅम्पल जीनोमिक सिक्वेसिंग ला पाठवण्यात आला होता. बुधवारी सी एस आय आर आय जी आय बी प्रयोगशाळेने 20 डेल्टा प्लस रुग्ण शोधून काढले आहेत.
त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील रुग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी दिली त्यानंतर अकोला आरोग्य विभागचे एक पथक अकोट कडे रवाना करण्यात आले आहे. संबंधित रुग्ण ची प्रकृति सध्या ठीक आहे व त्याच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे नमुने या आरोग्य पथकाद्वारे घेण्यात येत आहेत अशी माहिती डॉक्टर राजकुमार चव्हाण यांनी दिली. माहिती सूत्रानुसार आहे