Home माझं गाव माझं गा-हाणं देवळाण्यात कांदा पिकांचे लाखो रुपयांचे अज्ञाताकडून नुकसान

देवळाण्यात कांदा पिकांचे लाखो रुपयांचे अज्ञाताकडून नुकसान

574
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळाण्यात कांदा पिकांचे लाखो
रुपयांचे अज्ञाताकडून नुकसान
सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– आधीच शेतकरी वर्ग विविध संकटाना तोंड देऊन पुरता मेटाकुटीस आलेला आहे,त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाने उघडीप दिल्याने आणि त्यातच कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हतबल झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
आधीच त्रस्त झालेला शेतकरी वर्ग आता वेगळ्याच संकटाने हादरला आहे.सटाणा तालुक्यातल्या देवळाणे येथील शेतकरी आनिल पंडीत पवार यांच्या शेतात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या कांदा चाळीत कुणी तरी अज्ञात संशयिताने युरिया सदृश्य रसायन कांदा चाळीवर फेकल्याने पवार यांच्या लाखो रुपयांच्या विक्रीसाठी तयार असलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून,गुन्हेगाराचा शोध घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
याप्रकरणी आनिल पंडीत पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जायखेडा पोलिस स्टेशनला अज्ञात संशयित गुन्हेगाराविरुध्द भा.दं.वि.कलम ४२७ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असुन, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.

Previous articleअकोला जिल्ह्यात दुचाकी चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next articleबूलढाण्याचे माजी खासदार स्वश्री बालकृष्ण वासनिक यांच्याजयंतीनिमित्त सूजातपूर येथे आदरांजली वाहताना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here