राजेंद्र पाटील राऊत
सटाणा – (शशिकांत पवार, युवा मराठा न्यूज नेटवर्क सटाणा तालुका प्रतींनिधी ) –पिंगळवाडे येथे कोरोंना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सत्र राबवण्यात आले . पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र ताहाराबाद अंतर्गत येणार्या पिंगळवाडे येथे सदरील मोहीम राबवण्यात आली , या केंद्रावर सकाळ पासून नागरिकांनी लसीकरणा साठि गर्दी केली होती परंतु या केंद्रावर फक्त ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींनाच लस दिली जाईल असे सांगण्यात आल्या मुळे अनेक ४५ च्या आतील मंडळीचा हीरमोड झाला सकाळ पासून लसीकरण केंद्रावर नंबर लाऊन बसलेल्या ग्रामस्थाणा नाराज होऊन घरी परत जावे लागले .
या केंद्रावर फक्त ७० च डोस उपलब्ध झाल्या मुळे सकाळ पासून शेकडो लोकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती पण एवढा कमी डोस चा साठा असल्यामुळे अनेकांना लसीकरणपासून वंचित राहावे लागण्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे . तरी त्वरित मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करण्यात येऊन लसीकरणाला वेग देण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे . आठवड्यातून एकदाच लस साठा उपलब्ध होत असून ही मोहीम फिरत्या पद्धतीने प्रतेक उपकेंद्र प्रमाणे प्रत्येक गावात दर आठवड्याला राबवत असल्याचे वैधकीय अधिकारी यांनी संगितले .
या लसीकरणा साठी सरपंच सौ. लताबाई केदा भामरे, उपसरपंच संजय भामरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्ये केले. वैधकीय अधिकारी डॉ. नंदन मॅडम , आरोग्य सेवक श्री गौतम केदारे , आरोग्य सेविका श्रीमती. अहिरे मॅडम ,जि. प . मुख्या ध्यापक व शिक्षक तसेच सर्व अंगणवाडी सेविका , आशा सेविका यांनी अतोनात श्रम घेऊन सदरील लसीकरण पार पाडले.
“आठवड्यातून एकदाच लस उपलब्ध होत असल्याने व कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या रोषाला आरोग्य कर्मचार्यांना सामोरे जावे लागत आहे “ —-डॉ. नंदन मॅडम वैधकीय आरोग्य अधिकारी ,ताहाराबाद
‘’ शासनाने मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देऊन तात्काळ लसीकरनास वेग देऊन या आजारापासून संरक्षण करावे ‘”—– सौ. लताबाई केदा भामरे — सरपंच ,पिंगळवाडे.