Home माझं गाव माझं गा-हाणं कोरोना काळात के.बी.एच.च्या विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!

कोरोना काळात के.बी.एच.च्या विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!

192

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना काळात के.बी.एच.च्या
विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव- सध्या कोरोना महामारी संकटात सगळेच जण त्रस्त झालेले असून,प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या विवचेंनत सापडला आहे.या गोष्टींचा विचार करत मालेगांव शहरातल्या के.बी.एच.महाविद्यालयाच्या सन २००३ च्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत आपल्या मित्रांकडून आर्थिक मदत जमा करुन मालेगांव शहरातील गोरवाडकर यांच्या सहकार्यातून सुरु असलेल्या आनंद प्रसाद या सामाजिक कार्याला या विद्यार्थ्यांनी सुमारे बावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत एका धनादेशाव्दारे नुकतीच प्रदान केली आणि आपले सामाजिक उतरदायीत्व किती भक्कम आहे हे सिध्द करुन दाखविले त्यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मालेगांवच्या आनंद प्रसाद या सामाजिक कार्य करणाऱ्या परिवारामार्फत अनेक विधायक कार्य केले जातात त्यामुळे कोरोना काळात आपण आनंद प्रसाद परिवाराकडे दिलेली मदत निश्चितच सत्कारणी लागणार असल्याची भावना शेवटी के.बी.एचच्या माजी विद्यार्थ्यांनी “युवा मराठा न्युज” शी बोलताना व्यक्त केली.

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यात आज   अखेर 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज
Next articleCovid-19 अद्याप एकही डोस नाही मिळाली शिक्षक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.