राजेंद्र पाटील राऊत
मेशीत वयोवृध्द आजीचा अंत्यसंस्कार केला माणूसकीच्या भावनेतून कोरोना काळात एक आदर्श
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:-सध्या कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे व शासनाच्या नियमावलीमूळे अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची संख्या खूपच कमी झाली आहे अशातच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू वृद्धापकाळाने जरी झाला तरी त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला ग्रामीण भागात पुढे कुणीच सरसावत नसल्याचे विदारक चित्र बऱ्याच ठिकाणी बघण्यास मिळत आहे. असे असले तरी गावागावात अजून बरेच समाजसेवक पुढे येत अशावेळी अंत्यसंस्कारासाठी येत असल्याने माणुसकी अजूनही जीवंत असल्याचा अनुभव बघण्यास येत आहे.( थोडयाच वेळात बघा या बातमीची व्हिडीओ अपडेट)
असाच एक अनुभव देवळा तालुक्यातील मेशी गावात आला एका मातंग सामाजाच्या आजी वत्सलाबाई मानाजी अहिरे यांचा वयाच्या ७० व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकताच मृत्यू झाला. वत्सलाबाई ह्या मुळच्या मेशी येथील असून त्यांना तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता .एक महिन्यापूर्वीच आजीच्या एका मुलाचे निधन झाले एक मुलगा पुण्यात छोटा व्यवसाय करून कसाबसा प्रपंच चालवतो तर एक मुलगा नाशिक येथे असून वत्सलाबाई ह्या मेशी येथे भाड्याच्या खोलीत राहत होत्या. गावात कोरोना महामारीचा शिरकाव असल्याने अंत्यविधीसाठी कुणीही पुढे येत नसल्याने खांदे देण्यासाठी चार नातेवाईक घेत ग्रामपंचायत उपसरपंच भिका बोरसे,सदस्य शाहू शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे व ग्रामपंचायत प्रशासन आणि कर्मचारी यांनी पुढे येत वत्सलाबाईच्या अंत्यसंस्कारासाठी हातभार लावत एक आदर्श घालून दिला.