राजेंद्र पाटील राऊत
प्रतिनिधी.. प्रवीण अहिरराव
नाशिक मधील सातपूर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे .यामध्ये वधू अल्पवयीन असतानाही विवाह लावल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची सातपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ,की वधू अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही संशयित राजू उर्फ राजेंद्र बाळू कुराडे ,बायजाबाई राजेंद्र कुराडे, अविनाश प्रभाकर काळे, व त्यांचे इतर नातेवाईक यांनी सातपूर येथे मंगळवारी चांदवड पोलिस ठाण्यात दिनांक .13 एप्रिल रोजी वधू अल्पवयीन असल्याची समज दिलेली असतानाही हा विवाह केल्यामुळे सातपूर पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 9 ,10, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.




