राजेंद्र पाटील राऊत
ठेंगोडा येथे घरफोडी अडीच लाखाचा माल चोरटयांनी केला लंपास..!
(नयन शिवदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
ठेंगोडा-सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावातील जगन्नाथ बापू महाले वय ७० या वृध्द शेतकऱ्यांच्या घराचे पाठीमागील दरवाजाचे कडीकोंडयाचे नट तोडून आत प्रवेश करुन अज्ञात चोरटयाने सोने चांदीचे दागिने व एक लाख पंचवीस हजाराची रक्कम असा एकूण २ लाख ३२ हजार २५० रुपयाचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेल्याची फिर्याद सटाणा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.सोमवारी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान हि घटना घडली.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत