Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणेत कांदाचाळीवर अज्ञात समाजकंटकाने युरीया फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसानीची भिती…

व-हाणेत कांदाचाळीवर अज्ञात समाजकंटकाने युरीया फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसानीची भिती…

286

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणेत कांदाचाळीवर अज्ञात समाजकंटकाने युरीया फेकल्याने लाखो रुपयांचे नुकसानीची भिती…
मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क) नाशिकच्या मालेगांव जवळील व-हाणे गावी अज्ञात समाजकंटकाने एका शेतकऱ्यांच्या साठवून ठेवलेल्या कांदा चाळीवर युरीया नामक रसायन फेकल्याने लाखो रुपये किमतीचा कांदा सडून नाश पावण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,व-हाणे येथील शेतकरी सुभाष कौतीक वाघ व चंद्रकांत कौतीक वाघ या शेतकऱ्यानी कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने लाखो रुपयाचा कांदा हा चाळीत साठवून ठेवलेला होता.मात्र कुणी तरी अज्ञात हितशत्रुने साठविलेल्या या कांदा चाळीवर युरिया नामक रसायन टाकून दिल्याने संपूर्ण कांदा सडून नष्ट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.अगोदरच कोरोना महामारी संकटाने मेटाकुटीस आलेला शेतकरी वर्ग या अशा भयानक प्रकारामुळे हतबल झाला आहे.दरम्यान घटनास्थळावर पोलिस दाखल झाल्याची माहिती मिळत असून,नुकसानग्रस्त शेतकरी सुभाष वाघ व चंद्रकांत वाघ यांना शासनाने नुकसान भरपाई देऊन गुन्हेगारावर कारवाईची मागणी पुढे येत आहे.

Previous articleलोकवर्गणीतून होणार कोविड विलागिकरण कक्ष
Next articleदेगलूर येथे “श्रीराम जन्मोत्सव व हिंदू एकता दिवसानिमित्त कोरोणारूग्णांना गरम वाफेच्या मशीनचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.