Home नांदेड हिंदू मुलीला पूस लावून धर्मांतर करून मुलीच्या घरून 25 लाख रुपये आणि...

हिंदू मुलीला पूस लावून धर्मांतर करून मुलीच्या घरून 25 लाख रुपये आणि 74 तोळे सोने घेऊन मुस्लिम युवक फरार (

278

राजेंद्र पाटील राऊत

हिंदू मुलीला पूस लावून धर्मांतर करून मुलीच्या घरून 25 लाख रुपये आणि 74 तोळे सोने घेऊन मुस्लिम युवक फरार (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील एका मुस्लिम युवकांनी उदगीर येथील हिंदू मुलीला पूस लावून तिच्या घरून पंचवीस लाख रोख व 74 तोळे सोने घेऊन त्या मुलीला धर्मांतर करून फरार झालेला आहे. त्या मुस्लिम युवकाला अटक करण्यासाठी मरखेल पोलीस स्टेशन मध्ये मुलीच्या वडिलांनी तक्रार देण्यासाठी गेलेअसता, तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली आहे. असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. त्या आरोपीस तत्काळ अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी मागणी उदगीर विश्व हिंदु परिषदेच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. धर्मांतर इतक्या सहजतेने होते प्रसनल लाँ प्रमाणे धर्मांतर केले गेले आहे. अशाप्रकारे धर्मांतरण सहजतेने होत असेल, तर कायदे कडक होणे गरजेचे आहे. त्या आरोपीचा अद्यापही शोध पोलिसांनी घेतला नसून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Previous articleवाईट दिवस आले की मेहनत करावी आणि चांगले दिवस आले की मदत करावी- डॉ.राहुल कांबळे
Next articleनांदेड जिल्ह्यात कोरोना covid-19 अनुषंगाने नवीन नियमावली जाहीर . जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटणकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.