Home माझं गाव माझं गा-हाणं तळवाडे सरपंचपदी अहिल्याबाई जाधव तर उपसरपंचपदी प्रमोद (पप्पू) कदम बिनविरोध

तळवाडे सरपंचपदी अहिल्याबाई जाधव तर उपसरपंचपदी प्रमोद (पप्पू) कदम बिनविरोध

147

राजेंद्र पाटील राऊत

तळवाडे सरपंचपदी अहिल्याबाई जाधव तर
उपसरपंचपदी प्रमोद (पप्पू) कदम बिनविरोध
(निंबा जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क)
तळवाडे-मालेगांव तालुक्यातल्या राजकीयदृष्टया महत्त्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या तळवाडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपले यश कायम राखले असून,येथील सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अहिल्याबाई साहेबराव जाधव तर उपसरपंचपदी प्रमोद (पप्पू) शंकर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय महाले यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक साहेबराव कोर यांनी सहाय्यक म्हणून आपली भुमिका बजावली.यावेळी तळवाडे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंचाचा सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम यावेळी ग्रामस्थांनी केला.

Previous articleशिक्षक ध्येय: शिक्षकांसाठी मुक्त व्यासपीठ
Next articleकोरोना वाढतोय; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे : पालकमंत्री
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.