Home माझं गाव माझं गा-हाणं राज्यपाल महामहिम भगतसिह कोश्यारी यांची सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गांव भिंतघर येथे भेट

राज्यपाल महामहिम भगतसिह कोश्यारी यांची सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गांव भिंतघर येथे भेट

189

राजेंद्र पाटील राऊत

राज्यपाल महामहिम भगतसिह कोश्यारी यांची सुरगाणा तालुक्यातील गुलाबी गांव भिंतघर येथे भेट (युवा मराठा न्युज -पांडुरंग गायकवाड सुरगाणा तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम भगतशिंग कोश्यारी आज महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या आदिवासी बहुल भागातील गुलाबी गांव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला भेट दिली. त्याच्या स्वागतासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कळवण-सुरगाणा मतदार संघांचे आमदार नितीन पवार, एन. डी. गावित, धावपटू कविता राऊत, एव्हरेस्टवीर हेमलता गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत आदिवासी नृत्य सादर करून करण्यात आलं. राज्यपालांनी कविता राऊत व हेमलता गायकवाड यांचं त्यांच्या कामगिरी बद्दल कौतुक केलं तसंच आदिवासी भागात विकास घडवून आणू असं त्यांनी सांगितलं. आदिवासी मुलांच्या शिक्षणाकडे जास्तीतजास्त लक्ष दिलं पाहिजे. आदिवासी वनजमीन हक्क प्रमाणपत्र राज्यपाल यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आले.