Home नांदेड उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

203

राजेंद्र पाटील राऊत

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

नांदेड,दि. २९ – राजेश एन भांगे

महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला, संस्थांना शासना मार्फत नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी इच्छूक महिलांनी व संस्थानी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.narishaktipuraskar.wcd.gov.in व www.wcd.nic.in या संकेतस्थळावर शनिवार ३० जानेवारी २०२१ पर्यंत नामाकंने सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

अर्जदार महिलेचे वय १ जुलै २०२० रोजी २५ वर्षे असावे. अर्जदार संस्थेला महिला विकास कार्याचा ५ वर्षे अनुभव असावा. नामाकंन सादर करताना महिला विकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याचे व इतर आवश्यक कागदपत्रे नामांकन सोबत सादर करावे. नामांकने सादर करण्याचे अंतिम मुदत ३० जानेवारी २०२१ आहे. नामाकंने www.narishaktipuraskar.wcd.gov.in. व www.wcd.nic.in या वेबसाईटवर फक्त ऑनलाईन पध्दतीने भरावेत. अधिक माहितीसाठी www.wcd.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी, असेही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleमनोर वाहतूक शाखेच्या वतीने महामार्गावरील वाहतूक नियमांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा अभियान.
Next articleरायगड जिल्ह्यात लाच घेताना गट शिक्षणधिका-याला अटक …!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.