Home माझं गाव माझं गा-हाणं मनोर वाहतूक शाखेच्या वतीने महामार्गावरील वाहतूक नियमांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा अभियान.

मनोर वाहतूक शाखेच्या वतीने महामार्गावरील वाहतूक नियमांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा अभियान.

172

राजेंद्र पाटील राऊत

मनोर वाहतूक शाखेच्या वतीने महामार्गावरील वाहतूक नियमांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरक्षा अभियान.                 पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

पालघर, खानिवडे दि. 28 जानेवारी 2021, महामार्ग पोलीस शाखा मनोर तर्फे खानिवडे टोल नाक्यावर रस्ते सुरक्षा सप्ताह चे निमित्त साधून महामार्ग वाहतूक पोलिसांकडून आज बिना हेल्मेट प्रवास करणाऱ्या मोटर सायकल स्वारांना मनोर वाहतूक पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले, मनोर वाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश दिंडे यांच्या पुढाकाराने हि मोहीम राबविण्यात आली, बिना हेल्मेट प्रवास करणाऱ्या मोटर सायकल स्वरांना पकडून दंड करण्यापेक्षा त्यांना हेल्मेट देऊन हेल्मेट चे महत्व पटवून देण्यात आले, तसेच हेल्मेट घालून प्रवास करणाऱ्या मोटर सायकल स्वरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.तसेच वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना हे आवाहन केले की नेहमी हेल्मेट घालूनच प्रवास करावा जरी तो लहान प्रवास का असू नये. तसेच कार चालकांनी नेहमी सीट बेल्ट घालूनच प्रवास करावा, आणि आपल्या गाडीचा वेग हि नेहमी कमीत कमी असावा असे सांगितले. या वेळी वाहतूक शाखेचे उप विभागीय अधिकारी संदीप भागडीकर तसेच मनोर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी प्रताप दराडे मनोर वाहतूक शाखेचे प्रकाश दिंडे वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्तित होते, या वेळी उपस्तित प्रवाशांना हेल्मेट घालण्याचे फायदे सांगितले. आणि या नंतर बिना हेल्मेट चे पकडले गेल्यास सक्त कारवाई करण्यात येईल असे सांगितले, या वेळी हायवे वरील जखमींना मदत तसेच बरोबर वाहतूक पोलीस शाखेचे ए एस आई बिरकले, अहिरे,भडांगे, प्रवीण भोईर, एस. ठाकूर,जाधव, पाटील हे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्तित होते.

Previous articleपुणे _भोसरी पोलीसांची धडक कारवाई
Next articleउल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.