राजेंद्र पाटील राऊत
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सोहळा संपन्न
मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
हिंदुहृदयसम्राट मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.मुखेड तालुका व शहर शाखेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. बाळासाहेबांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन शिवसेनेचे माजी आमदार श्री सुभाषजी साबणे यांच्या हस्ते करण्यात आले.बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.मुखेड येथील किलबिल नगर मधील गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत 22 गावातील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविल्याने शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री संजय बेळीकर श्री वसंत संबुटवाड जिल्हा संघटक व्यंकटराव लोहबंदे तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.