मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.)येथील ग्रामपंचायत वर बहुजन ग्राम विकास आघाडी पॅनलचे वर्चस्व..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक2021 निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आल्या. यात मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.).या ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल दिनांक 18 जानेवारी रोजी लागला असून यात बहुजन ग्रामविकास आघाडी पॅनलने 9 पैकी 5 जागेवर आपले वर्चस्व दाखवून विजय मिळवला. त्यात (1) गनलेवार वनिता रमेश (2) नरवाडे मीनाक्षी संग्राम(3) वाघमारे राजू गंगाधर(4) सोनकांबळे रमाबाई संदीप (5) वादे जयश्री जळबा यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. सतत चाळीस वर्षापासून ग्रामवासीय मतदारांनी बहुजन ग्रामविकास आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला .यासाठी मतदारांचे आभार व्यक्त करण्यात आलेत् .याबद्दल त्यांचे गावकरी मंडळी तर्फे अभिनंदन करण्यात आले. व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर गावातून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प.दे.)येथील ग्रामपंचायत वर बहुजन ग्राम विकास आघाडी पॅनलचे...

