Home नांदेड देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथील ग्रामपंचायत वर बळीराजा ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व..

देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथील ग्रामपंचायत वर बळीराजा ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व..

232

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथील ग्रामपंचायत वर बळीराजा ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक2021 निवडणूक आयोगामार्फत घेण्यात आल्या. यात देगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव या ग्रामपंचायतीच्या एकूण नऊ जागांसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल दिनांक 18 जानेवारी रोजी लागला असून यात बळीराजा ग्रामविकास पॅनल नऊपैकी सहा जागेवर आपले वर्चस्व दाखवून विजय मिळवला. त्यात (1) व्यंकटराव मष्‍णाजी पाटील (2) भारतबाई व्यंकटराव लादे (3) नागेंद्र धोंडीबा मोरे (4) सुनिता रामदास पोंगले (5) नरसिंग अर्जुन मदने (बिनविरोध) तर (6) शेषाबाई मष्‍णाजी सूर्यवंशी (बिनविरोध) यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. त्याबद्दल त्यांचे गावकरी मंडळी तर्फे अभिनंदन करण्यात आले. व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर गावातून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleहिप्परगा माळ ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पँनलचे वर्चस्व..
Next articleसडक सुरक्षा – जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान 2021
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.