Home माझं गाव माझं गा-हाणं सुरगाणा -कळवण भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच केलं मोठं नुकसान

सुरगाणा -कळवण भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच केलं मोठं नुकसान

178

राजेंद्र पाटील राऊत

सुरगाणा -कळवण भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच केलं मोठं नुकसान (पांडुरंग गायकवाड युवा मराठा न्यूज तालुका प्रतिनिधी सुरगाणा )
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रासह कळवण, सुरगाणा भागात शेतकऱ्यांच्या नगदी पिकाचं खूप मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. कळवण तालुक्याच्या पश्चिम भागात तसंच सुरगाणा तालुक्याच्या पूर्व घाटमाथ्याच्या भागात टोमॅटो, स्ट्रॉबेरी, घेवडा, कांदा या नगदी पिकाची शेती केली जाते. अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने हे पिकं पुरते झोडपून काढली आहेत.स्ट्रॉबेरी सारख्या नाजूक पिकाचं जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे या पिकांच्या बाजारभावावर परिणाम होत असतो.अगोदरच फळभाज्या व पालेभाज्यांचे दर घसरले असून त्यात अजून अवकाळी पाऊस म्हणून या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने लोकांची पुरती तारांबळ उडाली.