Home Breaking News राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिना निमित्तानं काँग्रेस कमिटीत ध्वजवंदन

राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिना निमित्तानं काँग्रेस कमिटीत ध्वजवंदन

171

 

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये आज कोल्हापूर जिल्ह्या काँग्रेस सेवा दलाच्या वतीने २८ डिसेंबर स्थापना दिना निमित्तानं काँग्रेस कमिटीत
ध्वजारोहनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पालकमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत झाले.
देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये व त्या नंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या करिता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आज प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री.बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री, व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब , कोल्हापूर उत्तर चे आमदार श्री.चंद्रकांत जाधव , कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निलोफर आजरेकर , जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.बजरंग पाटील (तात्या ), कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष,मुख्य संघटक श्री.आर.के.देवणे साहेब , जिल्हा प्रवक्ता श्री.रणजीतसिंह पाटील , जिल्हा सचिव रघुनाथ पिसे , श्री.संजय पोवार , शहर अध्यक्ष श्री.प्रल्हाद चव्हाण , युवा मराठा चे कार्यकारी संपादक श्री.मोहन शिंदे. शिवतेज पाटील , श्रेयांश देसाई ,कोल्हापूर महापालिकेच नगरसेवक, नगरसेविका, तसेच कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवा दलचे सर्व कार्यकर्ते , महिला भागिणी, व सर्व पदाधिकारी इत्यादी मोठ्या संखेने उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleश्री.जगदीश रामदास बधान_ यांची अखिल भारतीय प्रबोधन संस्था राजकीय आघाडी सटाणा विधानसभा अध्यक्ष पदी निवड
Next articleआठवड्यातून दोनदा बाजार भारविण्याची वडगांव व्यापारी असोसिएशन ची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.