राजेंद्र पाटील राऊत
पुणे २८ डिसेंबर ⭕(युवा मराठा न्यूज पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप)⭕
साताऱ्यातील शिक्षक बालाजी जाधव ठरले आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
टाळेबंदीच्या काळात मुलांना शिक्षण देण्यासाठी अभिनव मार्ग शोधणारे बालाजी जाधव हे साताऱ्यातील शिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत . जाधव यांनी टाळेबंदीच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी केलेल्या कॉन्फरन्स कॉलद्वारे शिक्षणाच्या प्रयोगाची दखल *’ हनी बी नेटवर्क ‘ व ‘ गियान* या संस्थांनी घेतली आहे . बालाजी जाधव हे विजयनगर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी करोना टाळेबंदीतही मुलांना शिक्षणापासून वंचित राहू दिले नाही . त्यांच्या शाळेत ४० विद्यार्थी शिकतात .
जाधव यांनी दूरसंवादाच्या ( कॉन्फरन्स कॉल ) माध्यमातून एकावेळी दहा विद्यार्थी याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवले . मुलांना सहज आकलन होण्यासाठी गोष्टींचा वापर केला . मोठया मुलांना रोज सांगितलेल्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले . त्यातून विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव झाला . जाधव यांनी आठ महिने हा उपक्रम राबवून सर्वच विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला . एवढेच नव्हे , तर त्यांनी शेजारच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही मदत केली . या अभिनव कार्यासाठी त्यांना २४ डिसेंबरला एचबीएन क्रिएटीव्हिटी अँड एक्सलुजिव्ह ॲवॉर्डस पुरस्कार जाहीर झाला . त्यांच्यासह देशभरातील आणखी दहा शिक्षकांना हा पुरस्कार मिळालाहनीबी नेटवर्क व गियान या दोन संस्थांनी शिक्षणातील प्रयोगशीलता , नवप्रवर्तन यासाठी हा पुरस्कार ठेवला होता त्यात पारंपरिक ज्ञान पद्धतीतील रोजचे अडथळे दूर करणाऱ्या शिक्षकांचा विचार करण्यात आला . एकूण ८७ देशांतून २५०० प्रवेशिका आल्या होत्या . त्यात नऊ देशांतील ११ जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आले . बालाजी जाधव म्हणाले आतापर्यंत के लेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची राज्य , राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती . मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याचा आनंद आहे .