राजेंद्र पाटील राऊत
*उंद्री (प.दे )* येथील समस्यांसाठी ऊर्जामंत्र्यांना तसेच कार्यकारी अभियंत्यास ( *बांधकाम विभाग* ) निवेदन…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड : उंद्री (प.दे) येथील *नवीन डि.पी* च्या कामातील मंजुरी साठी होणारा विलंब लक्षात घेता आज *माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांच्या उपस्थितीत पुन:श्च महावितरण कार्यालयास कार्यवाही करण्यासाठी अवगत करण्यात आले
तसेच *मौजे उंद्री (प.दे) ते बेंडकी तांडा ,उंद्री (प.दे) – पाझर तलाव व उंद्री (प.दे) ते खोरी तांडा-जाहूर-तुपदाळ* या रस्त्यास *क्रमांक* देवून डांबरीकरण करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी यासाठी *माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर* यांना निवेदन देण्यात आले यावेळी माधवराव पाटील उंद्रीकर , सुधाकर गुरूजी गन्लेवार ,सरपंच प्र.शिवाजीराव पंदनवाड आदी उपस्थित होते.