Home माझं गाव माझं गा-हाणं आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना*

आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना*

155
0

राजेंद्र पाटील राऊत

 

*आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना*
(बाळासाहेब निकम/आनंद नागमोती युवा मराठा न्युज नेटवर्क)
कळवण : कळवण प्रकल्पातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात आल्याची माहिती कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पाश्वभुमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना कळवण प्रकल्पात राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबीयांना चार हजार रुपये लाभ मिळणार असून पन्नास टक्के रोख व पन्नास टक्के वस्तु स्वरूपात वितरित केला जाणार आहे. लाभार्थ्यांमध्ये ता. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर कार्यरत असणारे आदिवासी मजूर, आदिम, पारधी जमातीचे सर्व कुटुंब, शासनाने निश्चित केलेले गरजू आदिवासी कुटुंब ज्यामध्ये परित्यक्त्या, घटस्फोटित महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे व अनाथ मुलांचे संगोपन करणारी कुटुंबे यांचा समावेश आहे.
लाभार्थ्यांनी आधारकार्ड, जातीचा दाखला, रेशनकार्ड, बँक पासबुक इत्यादि कागदपत्रासह नजीकच्या आश्रमशाळेत ता. ५ डिसेंबर पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कळवण प्रकल्प कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleचाळीसगाव तालुक्यातील वीर पुत्र यश देशमुख दहशतवादी हल्यात शहीद*
Next articleकुंटुर पोलिसांनी दिले २६ / ११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून श्रध्दांजली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here