राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर महापालिकेने २ लाख ३२हजार थकित पाणिपट्टी वसूल
कोल्हापूर : शहरातील मनिषानगर,
साळोखेपार्क, मंडलिक वसाहत परिसरात तसेच राजारामपुरी राजेंद्रनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा वसूली पथकांनी काल २ लाख ३२ हजार रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले.
शहरातील मनिषानगर, साळोखेपार्क, मंडलिक वसाहत परिसरात तसेच राजारामपुरी राजेंद्रनगर परिसरातील महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा वसूली पथकाने १ लाख २२ हजार ६२५ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले असल्याची माहिती शहर पाणी पुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल यांनी दिली.
याबरोबरच थकीत पाणी बिलासाठी या पथकाने या परिसरातील थकबाकीदारांची पाणी ४ कनेक्शन बंद केली आहेत.
ही कारवाई पाणी पुरवठा विभागाचे वसूली पथक प्रमुख अमर बागल, मिटर रिडर रणजित संकपाळ, किशोर यादव, संदीत कांबळे विश्वास कांबळे यांनी सहभाग घेतला.
याबरोरबच राजारामपुरी राजेंद्रनगर परिसरातील २ पाणी कनेक्शन खंडित करुन थकबाकीपैकी १ लाख ९ हजार रुपयांची वसूली केली आहे. ही कारवाई मिटर रीडर रमेश मगदूम, संदीप माळी, बजरंग शिंगाडे आणि फिटर तानाजी माजगांवकर यांच्या पथकांने केली. थकीत पाणी बिलाच्या वसूलीसाठी यापुढेही विशेष पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याने नळ कनेक्शन धारकांनी आपले थकीत व चालूचे पाणी बिल तात्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंता नारायण भोसले यांनी केले आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .