राजेंद्र पाटील राऊत
पुन्हा लॉक डाऊनकरण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई – दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोना या साथ रोगाने डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्याचे जनतेशी रविवारी22 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री संवाद साधला. लसीवर अवलंबून न राहता कोरोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी. हा आपुलकीचा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज नेमकं काय बोलणार कुठला नवीन निर्णय जाहीर करणार याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात होते पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही उलट वाढणार आहे , ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना जास्त घातक आहे तरुणांपासून वृद्ध व्यक्तींना या आजाराची लागण होऊ शकते त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावीअनावश्यक घराबाहेर पडू नका कोरोना ची लक्षणे दिसली तर लगेच चाचणी करा गर्दी टाळा अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा मास्क नेहमी वापरा हात धुवत राहा योग्य अंतर पाळा हेच कोरोना टाळण्याचे उपाय आहेत असे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले.