Home कोल्हापूर विजबिल मागाल तर कोल्हापुरी पायताण खाल , कृती समिती कोल्हापूर

विजबिल मागाल तर कोल्हापुरी पायताण खाल , कृती समिती कोल्हापूर

147
0

राजेंद्र पाटील राऊत

विजबिल मागाल तर कोल्हापुरी पायताण खाल , कृती समिती कोल्हापूर

कोल्हापूर शहरात मिरजकर तिकटी येथे विज बिल भरणार नाही आसा मोठा फलक लावल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. फलकाच्या माध्यमातून ‘सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा..आम्ही बिल भरणार नाही.. सरकारने भरावे’, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळातील वीज बिले भरमसाट आल्याने नागरिकांमध्ये संतप्‍त भावना आहे.
यासंदर्भात सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अद्यापही शासनाने दखल न घेतल्याने कृती समितीने मिरजकर तिकटीला वीज बिल भरणार नसल्याचा फलक लावला आहे. कोरोना काळातील वीज मागणार्‍या सरकारला,वीज कट करणार्‍याला,
जनतेवर जबरदस्ती करणार्‍याला,
खणखणीत झटका,
अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण, असा आशय फलकावर झळकत आहे. फलकावर संपर्कासाठी समितीतील कार्यकर्त्यांचे नंबरही देण्यात आले आहेत.
वाढत्या वीज बिलविरोधात राज्यभरातील जनतेत असंतोष आहे. दरम्यान उर्जामंत्री राऊत यांनी विज बील माफ होण्याचा प्रश्नच येत नसल्याची घोषणे करताच कोल्हापूरी जनतेने पायतानच हातात घेतले. कोल्हापूरकरांनी मात्र, वीज जोडणी तोडाल तर कोल्हापुरी पायताण खाल, असा सज्जड दम महावितरणला कोल्हापूरकरांनी भरला आहे. अशा आशयाचे फलक कोल्हापुरातील मिरजकर तिकटी चौकात लावण्यात आले आहेत.

युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous article*”मुखेडात गोरगरिबांना स्वस्त दरात पुरवले जाणारे अन्नधान्य कचराकुंडीत
Next articleएसटीचं खासगीकरण करण्याचा महाआघाडी सरकारचा डाव, प्रविण दरेकरांचा आरोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here