राजेंद्र पाटील राऊत
देगलूर रा. काँ.पक्षाच्या कार्यालयाला मंत्री एकनाथराव शिंदेंच्या खाजगी सचिवने दिले सदिच्छ भेट
नांदेड,१८ – राजेश एन भांगे
ना. एकनाथरावजी शिंदे नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव श्री बालाजीराव खतगावकर यांनी काल दि.१६ रोजी देगलूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाला विशेष सदिच्छा भेट देवून दिपावालीच्या शुभेच्छा दिल्या.
तरी या वेळी खतगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा स्वीकृत सदस्य न. पा. श्री लक्ष्मीकांत पदमवार व मुख्याधिकारी चिंचाळकर यांनी शाल व श्रीफळ देऊन यथेच्छ सत्कार केला. यावेळी शैलेंद्र चौव्हाण, संजय मैलापुरे, माधव फूलारी, प्रविण चंदावार आदी उपस्थित होते.




