*मराठा आरक्षणाचा गोंधळ ,*
*अशोक चव्हाणच कारणीभूत*
*युवा मराठा न्यूज नेटवर्क*
मुंबई : मराठा आरक्षणावरुन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाचा गोंधळ असल्याचं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.
‘अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समितीला याबाबत गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. अशोक चव्हाण यांच्या बदलीची मागणी केली गेली होती. मात्र त्यांना पदावर कायम ठेवण्यात आलं.’ असं देखील मेटे यांनी म्हटलं आहे.
‘अँडमिशन आणि नोकर भरती थांबली आहे याला सरकार जबाबदार आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, नागेश्वर यांच्याकडे खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्याकडेच स्थगिती उठवण्याबाबत सुनावणी होणार आहे, सरकारला हे लक्षात आलं नाही का ?’ अशी टीका देखील मेटे यांनी केली.
घटनापीठ स्थापन करावं म्हणून सरकारने अजूनही अर्ज केलेला नाही, सरकारचा आरक्षणाबाबत दृष्टकोन यातून दिसून येतो. २७ ऑक्टोबरच्या सुनावणीत अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. घटनापीठ स्थापन केलं नसल्यानं यावरील निर्णय लांबण्याची शक्यता असून याला राज्य सरकार आणि उपसमिती जबाबदार असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे.
परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ताबडतोब 50 हजार प्रती हेक्टरी शेकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. ऊसतोड कामगारांसाठी शिवसंग्राममार्फत संप पुकारला आहे, हा संप दडपण्याचं काम साखर कारखाने करत आहे. असा आरोप मेटे यांनी केली आहे.