*मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले .
राज्यात सर्वच ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने आक्रमक झाला आहे . त्यामुळे मराठा समाज ठिकठिकाणी उपोषण , आंदोलन करून राज्य व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसत आहे.
पण अजुनही सरकार झोपेचे सोंग घेत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करत आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत असाच मोठ्या प्रमाणात चालुच राहणार असल्याचे उपोषणावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले .
यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा
जोरदार घोषणा दिल्या.
या आंदोलनस्थळी आज हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देवून मराठा बांधवांच्या आंदोलनाला व मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. समाजाच्या मागण्या योग्य असून लोकप्रतिनिधी म्हणून या मागण्यांना माझा पूर्ण पणे पाठिंबा देत असे सांगितले . मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मी सदैव मराठाबांधवांसोबत पाठीशी राहणार आहे अशी हमी यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली.
यावेळी हातकणंगले तालुक्यातुन मराठा समाज बांधव मोठ्या संख्याने उपोषणाला आले होते.