Home Breaking News नांदेड शहर गोळीबारीने पुन्हा एकदा हदरले, जुना मोंढ्यात बंदुकीचा धाक दाखवून लूटमार,...

नांदेड शहर गोळीबारीने पुन्हा एकदा हदरले, जुना मोंढ्यात बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, एक जखमी

115
0

नांदेड शहर गोळीबारीने पुन्हा एकदा हदरले, जुना मोंढ्यात बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, एक जखमी

नांदेड,दि ५ : राजेश एन भांगे
नांदेड शहरात झालेल्या गोळीबाराने शहर पुन्हा एकदा हदरले आहे.
या गोळीबारात एक युवक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शहरातील जुना मोंढा परिसरातील महाराज रणजीतसिह मार्केट येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली असुन.

मागच्या महिनाभराच्या काळात नांदेड शहर शांत होते, या काळात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची बदली सुद्धा झाली. त्या जागी प्रमोदकुमार शेवाळे हे रुजू झाल्याच्या पंधरा दिवसांतच ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दि.४ रोजी रविवारी दोन मोटर सायकिल वरुण आलेल्या चार आरोपींनी त्या भागातील कॉर्नरवर असलेल्या टपरी चालक आकाश परिहार यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस गोळी लागून ते जखमी झाले. व पुढील उपचारास हलविण्यात आले असल्याची माहिती आहे. सदरील आरोपींनी या भागातील विजय लक्षमी ट्रेडर या कापड दुकानातील गल्यातून दरोडेखोरांनी १० हजार रुपये हिसकावले. तसेच श्रीकृष्ण,मंगलमूर्ती व दिव्या ट्रेडर्स या दुकानावर गोळीबार करत व्यापाऱ्यात दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले. मागच्या काही वर्षांमध्ये नांदेड शहरात गोळीबार, लूटमार, खंडणी व अपहराण असे प्रकार घडत आहेत. सदरील घटना घडताच पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे घटनास्थळी दाखल झाले व
गोळीबार प्रकरणातील आरपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous articleहाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Next article*मराठा समाजाच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here