Home Breaking News हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

101
0

हाथरसच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडकवण्याचा कट ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

विशेष प्रतिनिधि – राजेश एन भांगे

उत्तर प्रदेश, दि.५ – हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला.
तर वेबसाइट वर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावं ? आणि काय करु नये ?
हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मदतीची नावाखाली हिंसाचार पसरवण्यासाठी निधीची व्यवस्था केली जात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
काही संघटनांनी ही उत्तर प्रदेशात हिंसाचार पसरविण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात समान भूमिका बजावली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमधील जमावाने हा राज्य सरकार विरोधात कट असल्याचं म्हटलं .
ते म्हणाले की ज्यांना विकास आवडत नाही, त्यांना जातीय हिंसा भडकवायची आहे.
ज्यांना विकास आवडत नाही, त्यांना जातीय दंगल भडकवायची आहे आणि राज्यातही दंगलीच्या नावाखाली विकास थांबेल, त्यांना दंगलीच्या नावाखाली राजकारण करण्याची संधी मिळाली आहे म्हणून ते नवे कट रचत राहतात असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण ?
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर बलात्कार झाला.
त्यानंतर तिच्यावर हल्ला करुन तिची जीभ छाटण्यात आली.
या मुलीवर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु होते.
मात्र २९ सप्टेंबरच्या रात्री या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यानंतर पीडित मुलीच्या मृतदेहावर घाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यानंतर देशभरात या प्रकरणी प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.

Previous articleनांदेड कौठा येथे ३० एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल ; पालकमंत्री अशोक चव्हाण
Next articleनांदेड शहर गोळीबारीने पुन्हा एकदा हदरले, जुना मोंढ्यात बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, एक जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here