Home Breaking News शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार ७२ तासाच्या आत विमा कंपनी कडे नोंदवावी ;...

शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार ७२ तासाच्या आत विमा कंपनी कडे नोंदवावी ; जिल्हाधिकारी डॉ. विपिन

222

शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार ७२ तासाच्या आत विमा कंपनी कडे नोंदवावी ; जिल्हाधिकारी डॉ. विपिन

नांदेड, दि. १९ ; राजेश एन भांगे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर दरम्याान काही मंडळात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय 29 जून 2020 नुसार ज्यात शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविणे बंधनकारक आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांना विमा कंपनीस सूचना देण्याची पद्धत माहिती नसल्यामुळे शेतकरी या नुकसानीची तक्रार विमा कंपनीस करत नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अतिवृष्टी किंवा पूर परिस्थतीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनीला तक्रार नोंदवावी. यासाठी शेतकऱ्यांना 18001035490 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवता येईल. कंपनीच्याा ई-मेल आयडी suportagri@iffcotokio.co.in वर तक्रार नोंदवता येईल. क्रॉप इन्शोरन्स अॅपद्वारे ही तक्रार नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार नोंदवता येईल. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Previous articleअखेर शरद पवारांच्या प्रयत्नाने* *कांदा निर्यातीला मिळाला हिरवा* *खंदील*
Next articleमृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.