आशाताई बच्छाव
राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सोहळा समिती जाहीर
विविध क्षेत्रातील १५१ व्यक्तींचा होणार शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे (मालेगाव) या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लवकरच मालेगाव नगरीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना
राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान २०२६ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात व्हावा यासाठी शिवछत्रपती पुरस्कार सोहळा समितीची कार्यकारिणी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेंद्र राऊत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एकमताने महाराष्ट्र राज्यातील निवडक व होतकरू व्यक्तींचा पुरस्कार सोहळा समितीत समावेश करण्यात आला आहे.कार्यक्रम आखीव रेखीव व सुंदर पद्धतीने झाला पाहिजे असा आमचा मानस असुन युध्दपातळीवर तयारी सुरू आहे.लवकरच आयोजन समिती पदाधिकारी व निवडक पुरस्कारार्थी यांच्यात विचार विनिमय करून पुरस्कार वितरण सोहळा दिनांक, वेळ व ठिकाण ठरविण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर वनसगाव (निफाड) यांनी दिली आहे.
पुरस्कार सोहळा आयोजन समिती पुढीलप्रमाणे
पुरस्कार सोहळा समिती अध्यक्ष — राजेंद्र राऊत पाटील (मालेगाव) ,राजेंद्र तुकाराम पवार उपाध्यक्ष (मालेगाव) ,उपाध्यक्ष – आशाताई बच्छाव (मालेगाव) पुरस्कार सोहळा प्रसिद्धी प्रमुख – रामभाऊ आवारे सर (निफाड), पुरस्कार सोहळा समिती सदस्य —प्रमोद पवार (मालेगाव) ,स्वप्निल देशमुख (बुलढाणा), प्रथमेश गायकवाड (ठाणे), पी एन देशमुख (अमरावती), सुरज गुंडमवार (गडचिरोली), विजय पवार (मुंबई)
अभिनेते- समाधान बिथरे (छत्रपती संभाजी नगर),स्वागताध्यक्ष – सौ कविता पद्माकर बाविस्कर (नाशिक), सुर्यकांत भोर (पुणे) कारभारी गव्हाणे (अहिल्या नगर) सतिश लाहुळकर (अकोला) नरेश पाटील (पालघर) नरेंद्र पाटील (जळगाव) हेमंत जगताप (नंदुरबार) दिलीप चव्हाण (नाशिक) ज्ञानेश्वर निकम (सोलापूर) दिलीप बोंडे (जालना) मनोज बिरादार (नांदेड) आनंद खजांची ( चंद्रपूर) मुजाहिद मोमीन ( रायगड) फैय्याज मोमीन ( भिवंडी) संदीप पाटील ( धुळे) आदींची शिवछत्रपती पुरस्कार सोहळा समिती वर निवड करण्यात आली आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजेंद्र राऊत पाटील मालेगाव व पुरस्कार सोहळा प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर वनसगाव तालुका निफाड यांनी दिली आहे.






