आशाताई बच्छाव
परळी तालुका व शहर पञकार संघाच्या वतीने दै. जगमिञ कार्यालयात दर्पणदिन उत्साहात साजरा
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.06/01/2025 रोजी परळी तालुका व शहर पञकार संघाच्या वतीने दै. जगमिञ कार्यालयात दर्पणदिन उत्साहात साजरा करण्यात आला असून परळी तालुका व शहर पञकार संघाच्या वतिने दै. जगमिञचे मुख्य संपादक बालासाहेब कडबाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परळी शहरातील जो थंडी आसो की पाऊस आश्या वातावरणात भल्या पहाट पासुन वृतपञ वितरक वितरणासाठी जिवाचे रान करतात आश्या वितरकांचा बाळासाहेब काटे, रामेश्वर पौळ, बाळु जोशी, उमाकांत खरबड, गवळी उदिंचा राष्ट्रवादी क्रांग्रेसचे शहराध्यक्ष व परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच वेळी परळी शहरातील बेवारस सापडलेल्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारा पर्यत जे पोलिसांच्या मदतीला रात्री आहोरात्री धावुन जातात असे शिवाजी लांडगे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना वृतपञ वितरकांसाठी जमिनचे हस्तांतर करून परळी नगर परिषदेच्या माध्यमातुन घरकुल बांधुन देण्याचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उबाठा गट, मा. उपनगराध्यक्ष अभय कुमार ठक्कर, प्रा. अतुल दुबे सर, दै. परळी प्रहारचे राजेश साबणे, शिवसेनेचे रमेश चौंडे, समाजसेवक मनोज आप्पा संकाये यांची उपस्थिती होती. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, शहराध्यक्ष रंगनाथ सावजी, कार्याध्यक्ष सुमित गिरी, सचिव मोहन चव्हाण, नितीन जाधव याच्यासह पञकार संघाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले यांनी मानले.






